... जेव्हा नदीलाही लागते आग!, fire in water, zarkhad

... जेव्हा नदीलाही लागते आग!

... जेव्हा नदीलाही लागते आग!
www.24taas.com, धनबाद, झारखंड

पाण्यामध्ये आग लागली... असं आपण कथा-पुराणांमध्ये ऐकलंय. मात्र झारखंडच्या धनबादच्या टर्कीतांड गावातल्या कतरी नदीतल्या पाण्यामध्ये आग लागलीय. पाण्यात कशी काय आग लागू शकते, हा विषय आता इथं चर्चेचा विषय ठरलाय.

पाण्यात लागलेली आग पाहून गावातले लोक गोंधळलेत. मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेल्या कतरी गावात विहिरी, तलाव सर्व जळालं होतं. केवळ कतरी नदी वाचली होती. मात्र, आता नदीतच आग लागल्यामुळे गावातले लोक भयभीत झालेत. ही आग लागलीच कशी? याबाबत कुणालाही काहीही कळत नाही.

नदीखाली अनेक वर्षांपासून कोळशाचं खोदकाम सुरू आहे आणि मायनिंगमुळे जमा होत असलेला ज्वलनशील गॅस अधिक दबावामुळे नदीतून असा आगीच्या रुपातून बाहेर पडत असल्याचं धनबादमधल्या कोळसा खाणीचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

धनबादच्या नदीतील आग आपण पाहिलीत. मात्र, इतरही ठिकाणी जमिनीखाली आग खदखदते. त्यामुळं स्थानिक लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. सरकारकडून मात्र ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत.

First Published: Friday, March 29, 2013, 10:01


comments powered by Disqus