नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू

Last Updated: Saturday, June 14, 2014, 07:51

नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू झालाय. कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये ही घटना घडलीये. तलावात बुडालेली तीनही मुले १० ते १२ वर्ष वयोगटातील आहेत.

पाझर तलावात पाणी नाही पण ‘पैसा’ पाझरला!

Last Updated: Friday, May 2, 2014, 22:01

औरंगाबाद पाझर तलाव योजनेत भ्रष्टाचार उघड झालाय. जालना जिल्ह्यातल्या पाझर तलाव घोटाळा प्रकरणी औरंगाबाद लाच-लुचपत विभागाने सिंचन विभागातल्या चार माजी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंत्र्यांनी मारली पाण्यात उडी, वाचवला लोकांचा जीव!

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 23:59

कर्नाटकातल्या एका ६१ वर्षांच्या मंत्र्यांनी तलावामध्ये उडी मारून बुडणाऱ्या कारमधल्या सहा जणांना वाचवण्याचा पराक्रम केला आहे. मंगळवारी हा प्रकार बेंगळुरूजवळ घडला.

Exclusive - रंकाळ्याची सफाई जीवावर उदार होऊन

Last Updated: Monday, August 26, 2013, 21:50

कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावातले पाणी हिरवे झाल्यानं आजूबाजूला दुर्गंधी पसरलीय. रंकाळ्याची ही परिस्थीती बदलण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं दोन बोटीच्या माध्यमातून उपायोजना सुरु केल्यात. पण या बोटीवर काम करणा-या सात कर्मचा-य़ाना मात्र जीव मुठीत धरुन काम करावं लागतंय.

रंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात

Last Updated: Thursday, August 15, 2013, 00:02

ऐतिहासिक कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणार रंकाळा तलाव. मात्र आज हा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडलाय. पाण्यात वाढलेलं शेवाळं कुजलंय. त्यामुळे सगळं पाणी अक्षरशः हिरवं झालंय. मनपाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा खराब झालाच आहे. पण नागरिकांचं आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.

बाप्पाच्या तलाव विसर्जनाला बंदी!

Last Updated: Monday, July 22, 2013, 12:59

एकिकडे संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगर पालिकेने बाप्पाच्या सर्वच प्रकारच्या मूर्तींच्या तलावात विसर्जनावर बंदी आणली आहे.

तलावाचा गाळ उपसताना सापडले दंतकथेतील मंदिराचे अवशेष!

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 20:39

कोल्हापूर जिल्ह्यातल्या अतिग्रे गावामध्ये तळ्यातला गाळ काढताना एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तळ्याच्या मध्यभागी असलेलं मंदिर शेष नारायणाचं असल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय.

तरण तलावात गावगुंडांनी पालकांना केली मारहाण!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 19:58

नाशिक महापलिकेच्या सावरकर तरण तलावात गावगुंडांनी घुसून पालकांना बेदम मारहाण केली. खेळाडूंच्या स्पर्धेतून हा प्रकार उद्भवल्याचं बोललं जातंय.

... जेव्हा नदीलाही लागते आग!

Last Updated: Friday, March 29, 2013, 10:04

पाण्यामध्ये आग लागली... असं आपण कथा-पुराणांमध्ये ऐकलंय. मात्र झारखंडच्या धनबादच्या टर्कीतांड गावातल्या कतरी नदीतल्या पाण्यामध्ये आग लागलीय

मुंबईकरांना गुड न्यूज, तलाव भरले!

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 21:13

मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनं तलावक्षेत्रात पाण्याची पातळी वाढतीये. पाऊसमान असंच राहिल्यास लवकरच तलाव ओसंडून वाहू लागतील, अशी स्थिती आहे. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये साडे तेरा लाख दशलक्ष लिटर साठा असणं आवश्यक आहे.

औरंगाबादमध्ये पाणीटंचाईचं संकट

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 08:16

औरंगाबादेत पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अर्ध्या औरंगाबादला शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलावही आता पूर्णपणे आटलाय.. शहरात आधीच दोन तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.. त्यामुळं आता काय होणार या भितीने औरंगाबादकर धास्तावलेत....

तलावात बुडून दोघांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 16:14

बुलढाणा जिल्ह्यातील वरवंड इथं 2 सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झालाय. त्यातील एक जण विवाहित आहे.

नुपूर तलावर आजची रात्र काढणार जेलमध्येच...

Last Updated: Monday, April 30, 2012, 21:59

नुपूर तलवारला आजची रात्र गाजियाबादच्या डासना जेलमध्ये काढावी लागणार आहे. एडीजे कोर्टानं नुपूर तलवारच्या जामीन अर्जावरील निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे.

ऐन उन्हाळी सुट्टीत तरण तलावाची दुरुस्ती

Last Updated: Thursday, April 26, 2012, 20:38

नाशिक महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका असंख्य जलतरणपटूना बसतोय. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या एकमेव जलतरण तलावाच्या दुरूस्तीच काम ऐन उन्हाळ्यात सुरु असल्यानं जलतरणपटूना जलतरणापासून वंचित राहव लागतं.

नागपूर : तलावात बुडून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 12:34

नागपूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. अभियांत्रिकी कॉलजेच्या तीन विद्यार्थ्यांना पोहताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.