Last Updated: Wednesday, April 16, 2014, 11:06
www.24taas.com, वृत्तसंस्था, रूद्रपूर/उत्तर प्रदेशएका शालेय विद्यार्थिनीची फेसबुकवर एका तरुणासोबत मैत्री झाली. आपल्या कुटुंबाला भेटवून देतो असं म्हणून तरुणानं मुलीला घरी बोलावलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना आहे उत्तरप्रदेशच्या रुद्रपूर (देवरिया) गावातली.
परीक्षा संपल्यानंतर पीडित मुलगी शाहपूर इथं राहणाऱ्या आपल्या मामाच्या घरी आली होती. एका आठवड्यापूर्वी फेसबुकवर गोरखनाथ क्षेत्राजवळील एका गावातील तरुण तिचा मित्र झाला. चॅटिंग करतांना एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि फोनवर बोलणंही सुरू झालं.
मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर आपल्या घरच्यांना भेटवतो असं सांगत तरुणानं मंगळवारी दुपारी तिला घरी बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. विद्यार्थिनीनं याबाबत तरुणाच्या वडिलांना सांगितलं. तेव्हा त्याच्या वडिलांनी तिला घरातून हाकलवून लावलं.
विद्यार्थिनीच्या मामाच्या तक्रारीवरून गोरखनाथ पोलीस स्टेशनमध्ये तरुण आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. एसपी परेश पांडेय यांच्या मते आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 16, 2014, 11:06