Last Updated: Wednesday, December 19, 2012, 19:21
www.24taas.com, सेलंबा (गुजरात)महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील सेलंबा येथील एका विद्यार्थीनीला गुंगीचे औषध सुंगवून चार नराधमांनी सामुहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला अक्कलकुवा बसस्थानकाच्या मागील एका शेतात फेकले.
सागबारा येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ वीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी महाविद्यालयातून घरी परतत असतांना तिला रस्त्यात अडवून गुंगीचे औषध सुंगवले. त्यात ती बेशुद्ध पडली. बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. नंतर तिला अक्कलकुवा बस स्थानकामागील एका शेतात बेशुद्धावस्थेतच फेकून दिले.
ही विद्यार्थीनी सेलंबा ता.सागबारा जि.नर्मदा येथील रहिवासी आहे.
याप्रकरणी इम्रान महम्मद अली मक्राणी, लालू गुलम रसुल पठाण, अब्दुल्ला पठाण व सद्दाम सर्व रा.सेलंबा यांच्याविरुद्ध सागबारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
First Published: Wednesday, December 19, 2012, 19:21