Last Updated: Friday, December 20, 2013, 10:12
www.24taas.com, झी मीडिया, चंडीगढचंडीगढ येथील १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गँगरेपची अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद घटना समोर आली आहे. या गँगरेपमध्ये ५ पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोप लावण्यात आला आहे. या पाच पोलिसांविरोधात शहराच्या सेक्टर १७ मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे.
तीन महिन्यांपूर्वी १० वीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनीने एका नातेवाईकाशी झालेल्या वादानंतर पोलिसांना फोन केला. या दरम्यान ज्या काँस्टेबलशी तिची बातचित झाली त्यातील एका कथित काँस्टेबलने तक्रार नोंदविण्यासाठी तिचे लैगिक शोषण केले. काँस्टेबलने बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर आपल्या गाडीत बलात्कार केला. त्यानंतर पीडित विद्यार्थीनी केवळ त्या काँस्टेबलची शिकार झाली नाही तर इतर चार काँस्टेबलनेही तिच्यावर बलात्कार केला. या पाच जणांनी दोन महिन्यांपर्यंत त्या मुलीवर बलात्कार केला.
सतत होणाऱ्या गँगरेपने त्रस्त झालेल्या विद्यार्थीनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या भावाने तिला वाचविले. विद्यार्थीनीने आपल्या भावाला सर्व हकिकत सांगितली आणि नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 20, 2013, 10:12