समलैंगिक संबंधप्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका, Gay relationships, Petition the government

समलैंगिक संबंधप्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका

समलैंगिक संबंधप्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

समलैंगिक संबंध प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केलीय.. सरकारनं कलम ३७७ विषयी पुनर्विचार करण्याची ही याचिका दाखल केलीय. या कलमानुसार सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध गुन्हा ठरवला होता.. यावर काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याआधी म्हटलं आहे. त्यांनी सर्वोच्य न्यायलयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

समलैंगिक संबंध ठेवणे हा अपराध आहे. तो गुन्हा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देताना म्हटले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना मान्यता असल्याचे म्हटले होते. याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना असे संबंध ठेवले तर तो गुन्हा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. याबाबत सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. अशा संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक, असे त्या म्हणाल्यात.

संसद भारतीय दंडविधानाच्या कलम ३७७ बाबत लक्ष घालेल, अशी अपेक्षा सोनियांनी व्यक्त केली आहे. समलैंगिक संबंध भारतात गुन्हाच असाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. दरम्यान, सोनियांच्या प्रतिक्रियेनंतर सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. समलैंगिक संबंध भारतात अपराधच हा निर्णय देताना न्यायालयाने सरकारला अॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांचं मत मागवून कायद्यात बदल करता येऊ शकतो, असंही सुचवलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 20, 2013, 16:00


comments powered by Disqus