Last Updated: Wednesday, April 16, 2014, 10:55
www.24taas.com, झी मीडिया, सिवनी, मध्यप्रदेश आपल्यावर झालेला बलात्कार जगापासून लपवून ठेवण्यासाठी एका गर्भवती पीडितेनं गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात उघडकीस आलाय. पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची नोंद झालीय.
१९ वर्षीय पीडित आदिवासी तरुणी तिच्याच गोत्रातील एका तरुणाकडून गेल्या एका वर्षापासून शारीरिक अत्याचार सहन करत होती. २४ वर्षांचा राजकुमार गौंड हा गेल्या वर्षभरापासून तिचं लैंगिक शोषण करत होता, अशी माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रियांका केवट यांनी दिलीय.
पीडित तरुणी सात महिन्यांची गर्भवती असताना कुटुंबीयांसमोर ही गोष्ट उघड झाली. केवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीनं आपल्यावर झालेले अत्याचार उघड होऊ नयेत आणि आपली छी-थू होऊ नये यासाठी गर्भपाताच्या गोळ्यांचं सेवन केलं होतं. त्यामुळे तिचा गर्भपात झालाच परंतु, तिच्या जिवालाही धोका निर्माण झाला. स्थिती हाताबाहेर गेल्यानंतर कुटुंबीयांनी पीडितेला हॉस्पीटलमध्ये दाखल केलं.
पीडितेच्या कुटुंबीयांनी गावातील पंचायतीसमोर या प्रकरणाचा सोक्ष-मोक्ष लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, इथं त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. आदिवासी समाजात एकाच गोत्रातील तरुण-तरुणींमध्ये विवाह केला जात नाही. एकाच गोत्रातील तरुण-तरुणींमध्ये भावा-बहिणचं नातं समजलं जातं. संबंधित तरुणाविरुद्ध पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी फरार आरोपी राजकुमार याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 16, 2014, 10:55