बलात्कार लपविण्यासाठी तिनं घेतल्या गर्भपाताच्या गोळ्या

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 10:55

आपल्यावर झालेला बलात्कार जगापासून लपवून ठेवण्यासाठी एका गर्भवती पीडितेनं गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात उघडकीस आलाय. पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची नोंद झालीय.

चालत्या रेल्वेत तरुणीवर अतिप्रसंग... पोलिसांनी खाली घातली मान!

Last Updated: Monday, December 16, 2013, 16:53

बंगळुरू-मुंबई रेल्वे गाडीत एका तरूणीची छेडछाडीची घटना घडीलय. रात्री प्रवास करत असताना संबंधीत तरुणीवर हा प्रसंग ओढावला.

तेजपाल यांचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत, शोमा चौधरी यांचा राजीनामा

Last Updated: Thursday, November 28, 2013, 15:05

तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आज दुपारपर्यंत हजर होण्याचे समन्स गोवा पोलिसांनी तेजपाल यांना बजावले आहेत. दरम्यान, गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेच हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये तेजपाल तरूणीसोबत दिसत आहेत. त्यामुळे तेजपाल यांच्या सुटकेची शक्यता कमी आहे.

सेक्स स्कँडल : तेजपालला कोर्टाकडून दिलासा नाहीच

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 19:14

‘तहलका’ सेक्स स्कँडल प्रकरणात स्वत:ला शोधपत्रकार म्हणवून घेणाऱ्या तरुण तेजपाल याला हायकोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही.

गोवा पोलिसांचे तरुण तेजपाल यांना समन्स

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 11:39

सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक हल्ला आणि विनयभंग प्रकरणी गोवा पोलिसांनी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना समन्स पाठवलाय. आपली बाजू मांडण्यासाठी लवकरात लवकर गोव्यात हजर रहावे असे आदेश गोवा पोलीसांनी तरूण तेजपालांना दिलेत.

तहलका : `जे काही झालं ते सर्व काही मुलीच्या मर्जीनुसारच...’

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 17:29

सहकारी तरुणीच्या लैंगिक शोषण प्रकरणी ‘तहलका’चे ‘एडिटर इन चीफ’ तरुण तेजपाल यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळलीय

सेक्स स्कँडल : तेजपालचीही होणार चौकशी

Last Updated: Sunday, November 24, 2013, 16:12

लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालांवर फास आवळण्यास सुरूवात झालीय. गोवा पोलिसांच्या टीमने नवी दिल्लीत चौकशीला कालपासून सुरूवात केलीय. आज तरूण तेजपाल यांना चौकशीसाठी बोलावणं पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

मुंबई गँगरेप : `ती`च्या आईचा कोर्टासमोर आकांत!

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 20:25

‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या मुलीचा फोन आला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं’ असं तरुणीच्या आईनं यावेळी सांगितलंय.

मुंबई गँगरेप : पीडित तरुणी रुग्णालयातून घरी परतली!

Last Updated: Thursday, August 29, 2013, 10:40

तब्बल आठवडाभरानंतर मुंबई गँगरेप प्रकरणातील पीडित तरुणीला जसलोक रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. गेल्या गुरुवारी, सामूहिक बलात्काराला सामोरी गेलेली ही २३ वर्षीय पीडित तरुणी मोठ्या धाडसानं जखमी अवस्थेत जसलोक रुग्णालयात दाखल झाली होती.

दिल्ली गँगरेप पीडितेच्या यशानं पाणावले डोळे!

Last Updated: Thursday, January 24, 2013, 09:36

दिल्ली बलात्काराच्या घटनेनं सगळा देश ढवळून काढला. हा खटलाही फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झालाय. त्याचवेळी या दुर्दैवी तरुणीनं दिलेल्या शेवटच्या परीक्षेचे गुण समजले आणि तिच्या यशानं पुन्हा एकदा अनेकांचे डोळे पाणावलेत.

‘आसाराम बापूंची पुस्तकं जाळून टाकणार’

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 09:57

मानवतेलाही काळीमा फासणाऱ्या दिल्लीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत मुलीलाच दोषी ठरवणाऱ्या आसाराम बापूंची समाजातील सर्वच स्तरांतून निंदा होतेय. खुद्द पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या आसाराम बापूंवर करडी प्रतिक्रिया दिलीय.

दिल्लीत पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार

Last Updated: Sunday, December 30, 2012, 11:11

दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीवर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहराज्यमंत्री आर पी एन सिंह उपस्थित होते. पीटीआयनं हे वृत्त दिलंय.

तिचा लढा व्यर्थ जाणार नाही – सोनिया गांधी

Last Updated: Saturday, December 29, 2012, 16:54

पीडित मुलीचा मृत्यू ही धक्कादायक घटना आहे... तिला न्याय मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन देत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.