Last Updated: Sunday, May 19, 2013, 18:09
www.24taas.com, झी मीडिया, डेहराडूनडेहराडूनमध्ये काही विद्यार्थिनींनी दारू पिऊन धिंगाणा घातला. आधी आपल्या कारने बाइकस्वारांना धडक दिलीं. नंतर भर रस्त्यात धुडगूस घातला. या सर्व आरोपी मुली राजकीय कुटुंबांशी संबंधित आहेत.
काही मुलांनीच अखेर या मुलींची डेहराडूनच्या एका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. या मुली दारू पिऊन आपल्याला छेडत असल्याची तक्रार मुलांनी पोलिसांकडे केली. या मुली मेरठच्या माजी बजपा खासदाराच्या मुली आहेत. बाकी मुलींचे वडील डेहराडूनमधील नेते आहेत. या मुलींनी आधी नशेमध्ये दोन बाइकस्वारांना धडक दिली. यानंतर मुलींनी रस्त्यात हैदोस घातला.
यावर लोकांनी या मुलींना जाब विचारल्यावर त्या मुलींनीच आपली छेड काढल्याचा आरोप करत तेथील मुलांना अडकवण्याचा प्रयत्न या मुलींनी केला. या मुलींना अखेर अटक करण्यात आलं. मात्र काही वेळातच जामिनावर सोडण्यात आलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, May 19, 2013, 18:09