शिक्षकांकडून विद्यार्थीनींची छेड, जाब विचारल्याने रोखले पिस्तुल

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 15:19

शाळेतले दोघे शिक्षक मुलींची छेड काढतात या आरोपावरून चेअरमनला जाब विचारायला गेलेल्या पालकांवर संस्थाध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी रिव्हॉल्व्हर रोखल्याची खळबळजनक घटना घडलीय.

छेडछाडीमुळे कॉलेजच्या तरुणीची आत्महत्या?

Last Updated: Friday, October 25, 2013, 19:20

पिंपरी चिंचवडमधल्या डी वाय पाटील कॉलेजच्या एका तरुणीनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. स्नेहा दिलीप गवई असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती बीबीए अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षाला होती. तिचं वय २२ वर्षं होतं.

तरूणीची छेडछाड : आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलीस निलंबित

Last Updated: Thursday, October 17, 2013, 13:02

छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांमध्ये एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.

छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 12:34

छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला तळेगाव दाभाडे इथे मंगळवारी हा प्रकार घडलाय.

वांद्र्यात छेडछाड काढणाऱ्यांना महिलांचा चोप

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 21:41

मुंबईत छेडछाडीच्या घटना थांबताना काही दिसत नाहीय. नुकतीच वांद्रेमध्ये एका कामगार महिलेची छेड काढल्याचं उघड झालंय.

बॉक्सिंग जगज्जेतीलाही झालाय वासनांधाचा त्रास!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 16:05

बॉक्सिंगची जगज्जेती! तेही पाचवेळा. तिच्या वाटयाला कोण जाईल? तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोण करणार? जो कोणी हे धाडस करेल त्याची काही खैर नाही. असं आपल्या वाटत असेल पण नाही, पाचवेळची जगज्जेती बॉक्सर मेरी कोमला विश्वविजेती होण्याआधी सुरुवातीच्या दिवसात असा वाईट अनुभव आला आहे.

शालेय मुलींच्या लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ

Last Updated: Sunday, September 29, 2013, 19:51

मुंबईत छेडछाडीच्या घटना वाढत असताना शाळेतल्या विद्यार्थीनींवर होणारे लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीचे प्रमाणदेखील वाढत चाललंय.

मुलींनी रस्त्यात घातला दारू पिऊन धुडगूस

Last Updated: Sunday, May 19, 2013, 18:09

डेहराडूनमध्ये काही विद्यार्थिनींनी दारू पिऊन धिंगाणा घातला. आधी आपल्या कारने बाइकस्वारांना धडक दिली. नंतर भर रस्त्यात धुडगूस घातला. या सर्व आरोपी मुली राजकीय कुटुंबांशी संबंधित आहेत.

महिलेची चालत्या ट्रेनमध्ये जवानाकडून छेडछाड

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 19:41

देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना.. सुरक्षेसाठी ज्यांच्याकडे आपण आशेने पाहतो तेच जवान महिलांवर वाईट नजर टाकत आहेत.

छेडछाड रोखल्याने जीव गमावला, पण कुटुंब वाऱ्यावर

Last Updated: Thursday, December 27, 2012, 15:03

डोंबिवलीमध्ये 3 डिसेंबरला छेडछाडीच्या घटनेत एका 19 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. या तरुणाची हत्या केलेल्या गुन्हागारांना तर पोलिसांनी पकडलं आहे पण पिडितांना होणारा त्रास इथेच थांबत नाही तर घटनेनंतर पिडितांच्या कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक वेदनांना सामोरं जावं लागतंय.

दहशत रोड रोमियोंची

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 23:03

डोंबिवलीमध्ये छेडछाडीला विरोध करणा-या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला करुन भर रस्त्यात त्याची हत्या केली. हल्ला होत असताना अनेक बघे तिथं होते. मात्र त्यांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.

धक्कादायक... अल्पवयीन रोड रोमिओंकडून तरुणाची हत्या!

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 09:14

डोंबिवलीत भर रस्त्यात एका युवकाची हत्या करण्यात आलीय. तरूणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना जाब विचारणाऱ्या १९ वर्षीय संतोष विचीवोरा याच्यावर सोमवारी रात्री ९.३० च्या दरम्यान पाच जणांनी चाकूनं हल्ला केला. या घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झालाय.

ओशिवारा परिसरात महिलेची छेडछाड

Last Updated: Monday, December 26, 2011, 10:24

बईत ओशिवारा परिसरात फिल्म प्रोड्युसर स्वराजसिंग वर्मा आणि त्याची एक महिला सहकारी हॉटेलमधून बाहेर पडत असताना दोन गुंडांनी या महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या दोघांना रस्त्यातच अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

Last Updated: Friday, November 4, 2011, 13:34

मुंबईच्या अंबोली परिसरातल्या या घटनेनं गुंडांना कशाचीच भीती राहिली नसल्याचं पुन्हा उघड झालं आहे. छेडछाड करणाऱ्यांच्या विरोध करताना तरुणांचा बळी जातो. त्यामुळं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.