Last Updated: Sunday, December 22, 2013, 18:30
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या क्रेडीट पॉलिसीत कर्ज व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत... याचाच सकारात्मक परिणाम म्हणून कर्जदारांना बँकांकडून एक गुड न्यूज मिळालीय. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या बँकांनी आपल्या गृहकर्जात कपात जाहीर केलीय.
याचा फायदा यापुढे गृहकर्ज घेणाऱ्या बँकेच्या ग्राहकांना होणार आहे. स्टेट बॅंक आणि एचडीएफसी यांनी नव्याने गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी व्याजदरांत ०.४ टक्यांार पर्यंत कपात केली आहे. स्टेट बॅंकेकडून घेतलेल्या ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी व्याजदर १०.५० ऐवजी १०.१५ टक्के लागू करण्यात येणार आहे. तसेच महिला कर्जदारांसाठी आणखी ०.०५ टक्यांरा ची सवलत मिळणार आहे. ७५ लाखांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्यांना आता १०.३० टक्के व्याजदर भरावे लागणार आहे. महिला कर्जदारांसाठी हे व्याजदर १०.२५ टक्के असणार आहे. हे दर शुक्रवारपासून लागू करण्यात आले आहेत.
‘एचडीएफसी’नं मर्यादित काळासाठी म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करणाऱ्यांसाठी नवीन कर्जदरांची योजना आणली आहे. ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी १०.५० टक्यांऐवजी १०.२५ टक्के व्याजदर राहील.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 22, 2013, 18:23