फेसबुकवर फेक अकाऊंट उघडणाऱ्यांनो सावधान!

Last Updated: Thursday, June 19, 2014, 18:19

फेसबुकवर अनेक फेक प्रोफाईल बनवले जातात आणि त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं केलेला दिसतो. यावर निर्बंध बसविण्यासाठी आता इज्राइलच्या एका कंपनीनं `फेक ऑफ अॅप` बनवलं आहे ज्यात आपण फेसबुकवरचं फेक प्रोफाईल शोधण्यास मदत करत असून हे अॅप १ वर्षासाठी फ्री देखील केला आहे.

गूड न्यूज.. म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 19:30

मुंबईकरांसाठी आता एक गूड न्यूज.. म्हाडानं घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यासाठी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती.

टक्कल पडलेल्या लोकांसाठी खुशखबर

Last Updated: Saturday, May 10, 2014, 14:16

टक्कल पडलेल्या लोकांसाठी खुशशबर टोकियो टक्कल असलेल्या लोकांसाठी रेस्टॉरंटच्या बिलात सुट दिली जाणार आहे. अकासका येथील एक रेस्टोरेंटने ही सूट दिली आहे.

गुडन्यूज... तुमचा पीएफ एटीएममध्ये मिळणार

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 12:29

बॅंक खात्यातील पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसेच आता तुमच्या पीएफ खात्यातील पैसेही एटीएममधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशासन कामाला लागले आहे. ही गुडन्यूज केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनीच दिलेय.

खूशखबर: सीएसटीवरील प्रवाशांची तंगडतोड थांबणार

Last Updated: Thursday, February 6, 2014, 11:56

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... आता सीएसटी स्टेशनवर लोकलच्या प्लॅटफॉर्मवरुन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आता तंगडतोड करण्याची गरज नाही. एक नवा ब्रीज सीएसटीवर तयार होतोय. तब्बल अठरा प्लॅटफॉर्मसना हा ब्रीज जोडणार आहे.

खुशखबर : ‘एसटी’मध्ये नोकरीची संधी!

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 11:41

नवीन वर्षात एसटी महामंडळानं एक खुशखबर दिलीय. आत्तापर्यंत एकदा नोकरभरती झाली की पुढचे चार-पाच वर्ष स्थगित राहणारी नोकरभरती यंदाच्या वर्षापासून दरवर्षी आणि तेही नियमितपणे होणार असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय.

नवीन वर्षातील गुड न्यूज - सरकारी नोकरीची संधी

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 12:42

महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातील आणि आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या अधिपत्याखालील मत्स्यव्यवसाय विभागातील सर्व प्रादेशिक व जिल्हा कार्यालयातील एकूण ६२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील सहा प्रादेशिक विभागीय कार्यालयस्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

खुशखबर : गृहकर्जाच्या व्याजदरात कपात!

Last Updated: Sunday, December 22, 2013, 18:30

रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या क्रेडीट पॉलिसीत कर्ज व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत... याचाच सकारात्मक परिणाम म्हणून कर्जदारांना बँकांकडून एक गुड न्यूज मिळालीय. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या बँकांनी आपल्या गृहकर्जात कपात जाहीर केलीय.

गुड न्यूजः नव्या वर्षात आहेत १०१ सुट्ट्या!

Last Updated: Thursday, December 12, 2013, 12:25

नव्या वर्षांचे कॅलेंडर घऱात आले की या वर्षात सरकारी सुट्ट्या किती आहे, याचा वेध सर्वजण घेत असतात. या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना थोड्या थोडक्या नाही तर तब्बल १०१ सुट्ट्या मिळणार आहे. म्हणजे केवळ २/३ दिवसच सरकारी नोकरदारांना कामावर जावे लागणार आहे.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर!

Last Updated: Monday, December 9, 2013, 21:45

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई मडगांव या मार्गावर लवकरच डबल डेकर ट्रेन दिसण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

म्हाडाची खुशखबर; आता मिळणार ३५६ फुटांचं घर!

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 09:18

सध्या म्हाडाच्या १६० फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना म्हाडानं खुशखबर दिलीय. वसाहतींच्या पुनर्विकासात सध्या १६० फुटांच्या घराच्या ऐवजी ३५६ फुटांचं घर मिळणार आहे.

विमानप्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी खूश खबर!

Last Updated: Sunday, August 4, 2013, 17:00

विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांनी आत्तापर्यंत कधीच विमान प्रवास केला नाही, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे.

पोलिसांसाठी खुशखबर...

Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:33

राज्यातल्या पोलीस अधिका-यांसाठी एक गुड न्यूज आहे....राज्यातील ८८३ पोलीस अधिका-यांच्या एकाचवेळी प्रमोशनसह बदल्या करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना भत्तावाढीची खूशखबर!

Last Updated: Friday, September 21, 2012, 09:29

वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांना गुड न्यूज, तलाव भरले!

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 21:13

मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनं तलावक्षेत्रात पाण्याची पातळी वाढतीये. पाऊसमान असंच राहिल्यास लवकरच तलाव ओसंडून वाहू लागतील, अशी स्थिती आहे. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये साडे तेरा लाख दशलक्ष लिटर साठा असणं आवश्यक आहे.

कुणी तरी येणार येणार गं.....

Last Updated: Saturday, December 10, 2011, 09:51

बॉलिवूड सध्या आता रंगलय ते 'गूड न्यूज'मध्ये अहो म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी ऐश्वर्या रायने सुंदर मुलीला जन्म दिला.