Last Updated: Friday, September 13, 2013, 16:11
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली ‘सरकारच्या इशाऱ्याखाली कोर्टानं दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलीय. न्यायाधीशांनी कोणत्याही पुराव्यांना आणि तत्थ्यांना न बघता केवळ सरकारच्या दबावाखाली येऊन हा निर्णय दिलाय’ असा आरोप या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी - ए. पी. सिंग यांनी केलाय.
'आमच्याकडे हायकोर्टात अपील करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी आहे. जनता, सरकार आणि विरोधकांना सांगू इच्छितो की, जर भारतात आणि दिल्लीत या कालावधीत कुठेही बलात्काराच्या घटना घडल्या नाहीत तर आम्ही हायकोर्टात अपील करणार नाही... पण, जर देशात कुठेही बलात्काराची घटना घडली तर आम्ही हायकोर्टात अपील करण्यास मागे हटणार नाही, असं निर्लज्ज वक्तव्य या वकिलानं केलंय.
'फाशी देण्यानं बलात्कार थांबणार असतील, तर आम्ही वरच्या कोर्टात जाणार नाही. हा पक्षपाती निर्णय आम्हाला अमान्य आहे. १० तारखेनंतर हा निर्णय बदलण्यात आला. कोर्टाच्या निर्णयाविरोधात आम्ही जाणारच...’ असं या वकिलानं म्हटलंय.
व्हिडिओ पाहण्यासाठी - /b>
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, September 13, 2013, 15:21