Last Updated: Wednesday, September 11, 2013, 08:26
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ची काळरात्र... चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टानं काल चारही आरोपींना दोषी ठरवलंय. आज या चारही नराधमांना सकाळी ११ वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. चौघा आरोपींना जास्तीत जास्त फाशी आणि कमीत कमी जन्मठेप होऊ शकते. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली होती आणि सरकारनंही पुढाकार घेत कडक बलात्कारविरोधी कायदा आणला होता.