मित्रांसोबत ग्रुप सेक्ससाठी पत्नीचा छळ, Group of friends was tortured wife for sex

मित्रांसोबत ग्रुप सेक्ससाठी पत्नीचा छळ

मित्रांसोबत ग्रुप सेक्ससाठी पत्नीचा छळ
www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

प्रमोशनसाठी पत्नी अब्रूचा सौदा करणाऱ्या आणि मित्रांसोबत ग्रुप सेक्ससाठी त्रास देणाऱ्या पतीला भोपाळ महिला पोलिसांनी अटक केली आहे. पती एका खासगी कंपनी वरिष्ठ पदावर काम करीत आहे. पण आरोपी विनोय नायर २० हजार रुपयांच्या जामीनावर तात्काळ सुटला.

पती सुटल्यामुळे पत्नीने कायद्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थितीत केले आहे. कोलार रोड येथील कान्हा कुंज येथील ३७ वर्षीय प्रितीने ( नाव बदलल आहे) २७ मे रोजी विनोय नायर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात मारहाण आणि कौटुंबिक कलह अंतर्गत तक्रार दाखल केली होती.

अनेक वर्षांपासून सहन करत होती त्रास
पीडित महिलेचा विवाह २००१ मध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या विनोय नायर याच्याशी झाला. लग्नानंतर पीडित महिलेला माहित झाले की त्याच्या पतीचे अनेक महिलांशी संबंध आहे. विनोदने अट ठेवली की, त्याला प्रमोशन देण्यासाठी अधिकाऱ्यांना खुश केलं आणि मित्रांसोबत ग्रुप सेक्स केला तर तो विवाह बाह्यसह संबंध ठेवणार नाही.

मी तर मस्करी करत होतो
पीडित महिलेने सांगितले, की विनोय लग्नानंतर मानसिक छळ करीत होता. विनोयने दोऱीचा फास बनवून ठेवला होता. पीडित महिला जेव्हा त्याच्या छळाला प्रतिकार करायची तेव्हा तो तिला दोरीचा फास टाकून मारण्याचा प्रयत्न करायचा.
ही घटना मुलांनी पाहिली तेव्हा विनोय म्हणाला तो मस्करी करीत होता. विनोयने आपल्या पोस्ट फायदा घेतल पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 30, 2014, 13:03


comments powered by Disqus