गुजरातमध्ये मतदान, Gujarat Assembly Elections 2012

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान
www.24taas.com, अहमदाबाद

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८७ जागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान झाले. जास्त मतदानाचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा आहे.

दुपारपर्यंत मतदान धिम्या गतीने होते. त्यानंतर मतदानाला रांगा लागल्याचे दिसून आल्यात. गुजरातमधील मतदान पाच वाजता संपले. त्यावेळी ६८ टक्के मतदान झाले. तर ४.३० वाजण्याच्या दरम्यान ६४ टक्के मतदान झालीची नोंद करण्यात आली होती. सरासरी ६८ टक्क्यांपर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. ही शक्यता खरी ठरलीय.

काही ठिकाणी किरकोळ मतदान यंत्रातील बिघाड वगळता मतदान शांततेत पार पडले. दुपारी ३ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान मतदान झाले होते.

गुजरात विधानसभेच्या मतदान सकाळी सुरूवात झाल्यानंतर पहिल्या पाच तासांमध्ये ३८ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा दिसून येत होत्या.

सकाळी १२ वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले होते. तर ११ वाजेपर्यंत १८ टक्के मतदान झाले. मतदानाला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. असे असले तरी संध्याकाळी ५ वाजता मतदान संपेल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सकाळी आठ वाजता सुरु झाले . कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरु झाले आहे. ८७ जागांसाठी मतदान करण्यात येत आहे. यात तीन कोटी ८० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होई नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदान झाले.

तर नवसारी येथील एका मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन नादुरुस्त झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे गुजरातचे वनमंत्री मंगूभाई यांना मा‍त्र मतदान करता आले नाही. २० तारखेला मतमोजणी होणार आहे.

First Published: Thursday, December 13, 2012, 13:58


comments powered by Disqus