जितका चिखल फेकाल,'कमळ' तितकं जास्त फुलेल

Last Updated: Thursday, December 20, 2012, 18:52

अहमदाबादमध्ये विजयानंतर नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले. भाषणात मोदींनी गुजराती बांधवांचे जाहीर आभार मानले. तसंच विरोधक आणि मीडियावर मात्र खोचक टोमणे मारले. या भाषणात विकासाचेच मुद्दे मांडून मोदींनी विकासाचं राजकारण करत असल्याचं दाखवून दिलं.

गुजरात - भाजपच्या दोन जागा कमी, काँग्रेसच्या दोन वाढल्या

Last Updated: Thursday, December 20, 2012, 18:45

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ११५ जागांवर तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळाला. प्रथमच राष्ट्रवादी पक्षाने गुजरातमध्ये खाते खोलत दोन जागांवर विजय मिळविला. तर केशुभाई पटेल यांच्या पक्षाने दोन जागा जिंकल्यात. केशुभाईंनी आपला मतदार संघ सांभाळला.

विजयानंतर मोदींनी केलं केशूभाईंचं तोंड गोड

Last Updated: Thursday, December 20, 2012, 17:26

स्पष्ट बहुमत मिळऊन भाजपाच्या नरेंद्र मोदींनी आपलं मुख्यमंत्रीपद राखलं आहे. 116 जागांवर विजय मिळवत पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. विजय संपादन केल्यावर नरेंद्र मोदी प्रथम आपल्या आईला भेटले आणि त्यांनंतर त्यांनी आशीर्वाद घेतला तो केशूभाई पटेल यांचा.

मला नाकारून लोकांनी सत्य नाकारलंय- श्वेता भट्ट

Last Updated: Thursday, December 20, 2012, 14:54

मणिनगरमध्ये नरेंद्र मोदींविरोधात नेटाने उभ्या असलेल्या श्वेता भट्ट यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे श्वेता भट्ट खूप दुःखी झाल्या आहेत. श्वेता भट्ट या निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नी आहेत.

गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी

Last Updated: Thursday, December 20, 2012, 11:05

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली असताना मणिनगरमधून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सलग तिसऱ्यांदा मोदी विजयी झाले आहेत.

गुजरात - हिमाचल विधानसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात

Last Updated: Thursday, December 20, 2012, 08:52

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गुजरातच्या १८२ विधानसभा मतदारसंघात ही मतमोजणी होतेय.

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान

Last Updated: Thursday, December 13, 2012, 18:48

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८७ जागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान झाले. जास्त मतदानाचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा आहे.

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु

Last Updated: Thursday, December 13, 2012, 12:12

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरु झाले आहे. ८७ जागांसाठी मतदान करण्यात येत आहे. यात तीन कोटी ८० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.