Last Updated: Sunday, February 2, 2014, 23:18
www.24taas.com, झी मीडिया, चंदीगडएका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.
हा तरुण नैराश्यग्रस्त असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्याला विविध कलमांखाली तातडीनं अटक करण्यात आलीये. मुख्यमंत्री हुडा हे रविवारी पानीपत येथे रोड शोमध्ये सहभागी झाली होते.
रोड शोला अपेक्षेप्रमाणे स्थानिकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र रोड शो शेवटच्या टप्प्यात असताना एका तरुणाने उडी मारुन जीपमध्ये उभे असलेल्या हुडा यांना श्रीमुखात लगावली. याप्रकाराने रोड शोमध्ये काही वेळे गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी तातडीने श्रीमुखात भडकवणा-या तरुणाला ताब्यात घेतले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 2, 2014, 23:18