आरोग्यमंत्र्यांवर प्रचार सभेत दगडफेक, रूग्णालयात दाखल, Kiran Chaudhary attacked public meeting

महिला मंत्र्यांवर प्रचार सभेत दगडफेक

महिला मंत्र्यांवर प्रचार सभेत दगडफेक
www.24taas.com, वृत्तसंस्था, नारनौल

हरियाणाच्या आरोग्यमंत्री किरण चौधरी यांच्यावर नारनौल येथील प्रचार सभेत दडगफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना तात्काळ गुरवागमधील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

किरण चौधरी या आपल्या कन्या आणि भिवानी-महेंद्रगढचे काँग्रेसच उमेदवार श्रुती चौधरी यांचा प्रचार करत होत्या. सभा संपल्यानंतर गाडीत बसत असताना एका गटाने त्यांच्या दिशेनेर दगडांचा मारा केला. या हल्ल्यात किरण चौधरी यांच्या छातीवर दगड बसला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

किरण चौधरी यांना तात्काळ एका हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे गुरगाव येथे हलविण्यात आले. अद्यापही प्रकृती गंभीर आहे. या हल्यामुळे येथील वातावरण तंग आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 09:54


comments powered by Disqus