गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेल्याच्या संशयानं त्यानं केली मित्राची हत्याHe killed his friend, doubt friend

गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेल्याच्या संशयानं त्यानं केली मित्राची हत्या

गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेल्याच्या संशयानं त्यानं केली मित्राची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आपल्या प्रेयसीला तो डेट करतो या संशयानं मित्रानं मित्राचीच हत्या केल्याची घटना घडलीय. नवी दिल्लीत हा प्रकार घडलाय. प्रदिप नावाच्या एका जिम ट्रेनरची हत्या झालीय. बिअरची बॉटल त्याच्या डोक्यावर फोडून प्रदिपची हत्या करण्यात आली.

याप्रकरणी रिंकू आणि टिंकू नावाच्या दोघांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि प्रदिप जिम ट्रेनर होते. दोन आरोपींपैकी एकाच्या प्रेयसीसोबत प्रदिप डेटिंग करतोय, असा संशय आरोपीला होता. याचमुळं त्यांच्यात भांडणही झालं.

काही दिवसांनंतर बदला घेण्यासाठी आरोपींनी तिमारपूर भागात पार्टीसाठी प्रदिपला बोलवलं आणि त्याची हत्या केली. जेव्हा घरी प्रदिप पोहोचला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यानंतरच्या तपासात हा पुढच्या प्रकार समजला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 30, 2014, 13:04


comments powered by Disqus