Last Updated: Wednesday, March 27, 2013, 13:47
www.24taas.com, नवी दिल्ली देशात सर्वत्र धुळवडीची धूम आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत होळीचा उत्साह दिसून येतोय. हाच उत्साह भारताच्या सीमा ओलांडत पाकिस्तानातही दिसत आहे.
खास भारतीय होळी पाहण्यासाठी विदेशी पाहुणेही दाखल झालेत. तेदेखील होळीच्या रंगात न्हाऊन निघत आहेत. श्रीकृष्णाच्या वृंदावनमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी साजली केली जातेय. कोलकात्यामध्ये रविद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनमध्येही होळीचा उत्साह आहे. एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या जातायत.
काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवरही होळीची धूम सुरू आहे. भारतीय जवानांनी होळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत धुळवड साजरी केली. सकाळीच सर्व जवान एकत्र जमले. धुळवडीनिमित्त धमाल गाणी, मस्ती करत जवानांनी धुळवडीचा आनंद साजरा केला. आर्मीच्या या जवानांनी मस्त डान्समस्ती करत होळीचा हा अनोखा उत्सव आज एन्जॉय केला.
देशभरात होळी-धुळवडीची धूम असताना सीमापार पाकिस्तानमध्येही होळी साजरी होतेय. कराचीतल्या हिंदू-मुस्लिम बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघत आहेत.
First Published: Wednesday, March 27, 2013, 13:47