कर्नल निजामुद्दीन यांनी सांगितली, सुभाष बाबुंच्या मृत्यूची कहाणी how subhash babu died

कर्नल निजामुद्दीन यांनी सांगितली, सुभाष बाबुंच्या मृत्यूची कहाणी

कर्नल निजामुद्दीन यांनी सांगितली, सुभाष बाबुंच्या मृत्यूची कहाणी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

वाराणसीमधील रोहनियाच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी ज्या व्यक्तीचे वाकून पाय धरले. ती व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक राहिली आहे. कर्नल निजामुद्दीन असं त्यांचं नाव असून, ते वय 115 वर्षांचे आहेत. मोदींनी कर्नल निजामुद्दीन यांचा व्यासपिठावर सन्मान केला. तसेच व्यासपिठावर कर्नल निजामुद्दीन समोर वाकून त्यांचा आशिर्वाद पण घेतला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 17 ऑगस्ट 1945 ला एका विमान दुर्घटनेत न होता. नेताजींचा मृत्यू हा 20 ऑगस्ट 1945 ला झाला. नेताजींचा मृतदेह बर्माच्या छितांग नदी किनारी मिळाला होता. जपानी सैनिकांनी त्यांचा मृतदेह हा तिथून उचलला होता. हा दावा कोणी दूसऱ्यांनी केला नसून, खुद्द कर्नल निजामुद्दीन यांनी केला आहे.

नेताजींचे अंगरक्षक राहिलेले कर्नल निजामुद्दीन हे अकरा भाषेंचे जाणकार आहेत. कर्नल काशीच्या विद्यापिठात विशाल भारत संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका समारोहात आले होते. यावेळी त्यांनी बोलत असताना सांगितलं की, `सुभाष बाबुंना मी स्वत: बर्माच्या छितांग नदी किनारी अखेरचं पाहिेलं होतं. माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं की, जपानी सैन्य नेताजींना उचलून घेऊन जात होते. ब्रिटीश सरकारने माझा जबाबपण नोंदवला नाही आणि सरळ सुभाष बाबूंच्या मरण्याची अफवा उठवून दिली.`

`कर्नल यांनी सांगितलं की, नेताजींची गाडी ही 12 सिलेंडरची होती. सुभाष बाबुंचं राहणीमान खूप साधं होतं. त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तीन चार लोकं त्यांच्यासोबत राहत.` सिंगापूरमधून सगळे सैनिक भारतात आल्यानंतरच नेताजींनी कर्नल निजामुद्दीन यांना भारतात परतण्याचे आदेश दिले होते. या कारणाने 5 जून 1969 साली कर्नल पुन्हा भारतातील आजमगढमध्ये परतले.

आपण जे बोलत आहोत. हे खरं असल्याच सिद्ध करण्यासाठी कर्नल निजामुद्दीन यांनी त्यांच आजाद हिंद सेनेचं ओळखपत्र देखील दाखवलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 12:06


comments powered by Disqus