कर्नल निजामुद्दीन यांनी सांगितली, सुभाष बाबुंच्या मृत्यूची कहाणी

Last Updated: Friday, May 9, 2014, 13:10

वाराणसीमधील रोहनियाच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी ज्या व्यक्तीचे वाकून पाय धरले. ती व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक राहिली आहे. कर्नल निजामुद्दीन असं त्यांचं नाव असून, ते वय 115 वर्षांचे आहेत. मोदींनी कर्नल निजामुद्दीन यांचा व्यासपिठावर सन्मान केला. तसेच व्यासपिठावर कर्नल निजामुद्दीन समोर वाकून त्यांचा आशिर्वादपण घेतला.

तरण्या प्रेयसीसाठी म्हाताऱ्या प्रियकरांची `फायटिंग`!

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:27

`तो` आपल्या तरण्या प्रेयसीवर लाईन मारतो म्हणून म्हणून एका ८० वर्षाच्या वृद्धानं ६५ वर्षीय वृद्धावर सुरा आणि कात्रीनं प्राणघातक हल्ला केला. ही घटना सिंगापूरमध्ये घडलीय.

तुम्ही रेल्वेच्या तिकिटात करा विमान प्रवास!

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 07:39

तुम्ही कधी विमानाने प्रवास केला नसेल तर ते कमी पैशात शक्य आहे. केवळ ५०० रूपयांत विमान भरारी घेऊ शकता. टाटा समूहासोबत हवाई क्षेत्रात पाऊल टाकलेल्या एअर एशिया या विमान कंपनीने भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५०० रूपयात अनोखी स्कीम अंमलात आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तुम्ही रेल्वेच्या एसी तिकीट दरात म्हणजे ५०० रूपयांत विमान प्रवास करू शकता.

भारतीय युवा टीमनं ‘पाक’ला चारली धूळ!

Last Updated: Sunday, August 25, 2013, 16:28

सिंगापूर इथं झालेल्या २३ वर्षांखालील एसीसी इमिर्जिंग ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात ९ गडी राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविलाय. या मॅचमध्ये भारतानं आपल्या प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी करत पाकिस्तानला अक्षरश: धूळ चारलीय.

सिंगापूरमध्ये दोघा भारतीयांचा वेश्या व्यवसाय

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:43

परदेशात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघा भारतीयांना सिंगापूर पोलिसांनी अटक केलीय. वेश्या व्यवसाय करण्यासंबधीच्या गुन्ह्याबद्दल भारतीय जुळ्या भावंडांना साडेतीन महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

भारतीय अभियंत्याचा सिंगापूर स्फोटात मृत्यू

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 17:15

सिंगापूरमध्ये झालेल्या स्फोटात एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाला. जुरॉग बेटावर बांधकाम सुरू असताना हा स्फोट झाला.

सिंगापूरहून पीडित तरुणीचा मृतदेह भारतात

Last Updated: Sunday, December 30, 2012, 07:27

दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह भारतात आणण्यात आलाय. एअर इंडियाचं खास विमान तरुणीचा मृतदेह घेऊन पहाटे साडेतीन वाजता दिल्लीत दाखल झालं.

गँगरेप प्रकरण: पीडित तरूणीचा सिंगापूरमध्ये मृत्यू

Last Updated: Saturday, December 29, 2012, 08:02

दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरलीय. शुक्रवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे.

गँगरेप प्रकरण: तरूणीच्या मेंदूला आणि आतड्यांना दुखापत

Last Updated: Friday, December 28, 2012, 13:41

दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीच्या मेंदूला दुखापत झाल्याचं सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

गँगरेप पीडित तरूणींची तब्येत अतिशय नाजूक

Last Updated: Friday, December 28, 2012, 10:50

उपचारासाठी सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या दिल्ली गँगरेप पीडित तरुणीची तब्येत खूपच नाजूक झाली आहे.

गँगरेप: तरूणीची प्रकृती नाजूक, सिंगापूरला हलवले

Last Updated: Thursday, December 27, 2012, 14:59

दिल्ली गॅंगरेप प्रकरणातील पीडित तरुणीची प्रकृती अधिकच खालवली असल्याने तरूणीला तात्काळ सिंगापूरला हलविण्यात आले आहे.

मुंबईचं शांघाय आता नागपूरचं सिंगापूर?

Last Updated: Monday, February 13, 2012, 15:03

अनेक वर्ष सत्ता उपभोगून सुध्दा काँग्रेसला मुंबईचं शांघाय करता आलेलं नाही ते नागपूरचं सिंगापूर काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला विचारला आहे.