Last Updated: Tuesday, June 25, 2013, 18:58
www.24taas.com, झी मीडिया, गौरीकुंडकेदारनाथ ते गौरीकुंड येथे बचाव कार्य करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे एम आय -१७ हे हेलिकॉप्टर गौरीकुंड येथे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या अपघातात पाच क्रू मेंबर आणि तीन इतर ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गोचर ते गुप्तकाशी आणि केदारनाथ या भागात बचावकार्य सुरू होते. आज सायंकाळी गौरीकुंड येथे परतत असताना हा अपघात झाला. या अपघाताची चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. अपघात झाला असला तरी बचाव कार्य सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑपरेशन राहत अंतर्गत ४५ विमाने आणि हेलिकॉप्टर हजारो नागरिकांना गेल्या १७ जून पासून वाचवित आहेत. गेल्या काही दिवसांपासून खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर उड्डाण स्थगित करण्यात आले होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 18:58