Last Updated: Monday, January 20, 2014, 08:22
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धोका असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. केजरीवाल यांचं अपहरण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पोलिसांच्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळच्या सुटकेसाठी हा अपहरणाचा कट रचला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.
याबाबत दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील माहिती दिलीय. सध्या दिल्ली पोलिसांकडून केजरीवाल यांच्या सुरक्षेचा रिव्ह्यू घेतला जातो. अरविंद केजरीवाल यांनी याआधीच कुठल्याही प्रकारची सुरक्षा घ्यायला नकार दिला आहे. तरीही दिल्ली पोलिसांचे साध्या वेशातले पोलीस केजरीवाल यांच्या असतातच.
आता दिल्ली पोलीस केजरीवाल यांच्या सुरक्षेचा विचार करत आहेत. त्यामुळं पोलिसांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यासमोर झेड दर्जाची सुरक्षेचा प्रस्ताव ठेवला आहे. पण केजरीवाल सुरक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती आपच्या सुत्रांनी दिली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 20, 2014, 08:21