मारिया शारापोवा भारतात आली नी, प्रेमात पडली, Maria Sharapova, delicious dosas were the civil

मारिया शारापोवा भारतात आली नी, प्रेमात पडली!

मारिया शारापोवा भारतात आली नी, प्रेमात पडली!
www.24taas.com,नवी दिल्ली

टेनिस कोर्टवरील ग्लॅमर गर्ल मारिया शारापोवा पहिल्यांदा भारतात आली आहे. ती चक्क डोशाच्या प्रेमात पडली. त्याचबरोबर भारतात आल्यामुळे अतिशय चांगले वाटत आहे. भारतात यायला मी उशीरच केला, असे शारापोवा हिने स्पष्ट केले.

सर्वप्रथम एखाद्या भारतीय पदार्थाचा आस्वाद घ्यायचा होता. हॉटेलच्या मुख्य आचाऱ्याने मला डोसा खायला दिला. हा पदार्थ अतिशय लाजवाब होता.शारापोवाने दक्षिण भारतातील लोकप्रिय पदार्थ डोशाविषयी आपले प्रेम सार्वजनिक केले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सहा फूट दोन इंच उंचीच्या शारापोवाने एक अब्जपेक्षा अधिक लोकांच्या या देशात माझे कोट्यवधी चाहते असल्याचेही नमूद केले.

शारापोवा म्हणाली, या शहरात मोठा उत्साह आणि ऊर्जा आहे. तुम्ही सर्व लोक अतिशय चांगले आहात. येथे आल्यामुळे अतिशय चांगले वाटत आहे. भारतात यायला मी उशीरच केला, असे म्हणावे लागेल. माझे येथे अनेक चाहते आहे. येथील जोरदार स्वागतामुळे मी भारावून गेले. हे वर्ष माझ्यासाठी अतिशय चांगले ठरले. कारण, मोकळ्या वेळेचा फायदा घेऊन मी येथे येऊ शकले.

मॉडेलिंग किंवा चित्रपटात करियर करणार नसल्याचे शारापोवाने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सध्यातरी माझ्याकडे टेनिसशिवाय अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वेळ नाही.

First Published: Monday, November 12, 2012, 08:09


comments powered by Disqus