महागाईचा भडका, गॅस सिलिंडर पुन्हा महागला, increase gas cylinder price

महागाईचा भडका, गॅस सिलिंडर पुन्हा महागला

महागाईचा भडका, गॅस सिलिंडर पुन्हा महागला
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आधीच महागाईत होरपणाऱ्या सामान्यांना पुन्हा गॅस दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. सातत्याने वाढणाऱ्या किंमतीमुळे गृहीणींनी तीव्र नाराज व्यक्त केला आहे.

गॅस सिलिंडर वितरकांना आपल्या कमिशनमध्ये ९ टक्के वाढ करण्याच निर्णय केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ३.४६ रुपयांनी महागला आहे. ही दरवाढ मंगळवारपासूनच तातडीने ही लागू करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करणार्‍या गॅस सिलिंडर वितरकांना १४.२ किलोच्या प्रत्येक सिलिंडरमागे दिले जाणारे कमिशन ३.४६ रुपयांनी वाढवून ४०.७१ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किरकोळ दरात वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर वितरक अनेक महिन्यांपासून कमिशन वाढीची मागणी करीत होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 11, 2013, 08:26


comments powered by Disqus