Last Updated: Wednesday, February 12, 2014, 18:45
www.24taas.com , झी मीडिया , वॉशिंग्टन वृत्तपत्र आणि प्रसिद्धी माध्यमांना देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्याबाबत जागतिक क्रमवारीत भारत १४०व्या क्रमांक आहे. भारताचे शेजारी राष्ट्र असणारे चीन आणि पाकिस्तान हे प्रेसच्या अधिकाराबाबत भारतापेक्षा पिछाडीवर आहे. चीनचा या क्रमवारीत १७५ व्या आणि पाकिस्तानचा १५८ व्या क्रमांकावर आहे.
रिपोर्टर्स विदाउट बॉर्डरने आपली नवीन यादी जाहीर केली, त्यात भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्यावर असणाऱ्या निर्बंधावर कडक ताशेरे आढले आहेत. भारतातील प्रत्रकारांवर हिंसेचे सावट असते. २०१३मध्ये ८ पत्रकारांना मारण्यात आले.
या अहवालात सरकार आणि राजकारणी मंडळीना यासंदर्भात दोष देण्यात आला आहे. भारतातील कुठल्याच राज्यात वृत्तपत्रांना स्वातंत्र्य नाही, काश्मीर आणि छत्तीसगढ ह्या दोन राज्यात हिंसा आणि सेंसॉरशिपचा वारंवार सामना करावा लागतो आहे.
याच क्रमवारीत २००९ मध्ये १०५ व्या स्थानावर असणारा भारत २०१३ मध्ये १४० व्या स्थानावर घसरला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 12, 2014, 18:35