अबब!!!! बघा ही भारताची लोकसंख्या झाली तरी केवढी, India`s population

अबब!!!! बघा ही भारताची लोकसंख्या झाली तरी केवढी

अबब!!!!  बघा ही भारताची लोकसंख्या झाली तरी केवढी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

२००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत जाहीर केली आहे. १ मार्च २०११ रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज २० कोटी झाली आहे.

गेल्या दशकात देशाची लोकसंख्या १७.७ टक्क्यांनी वाढली आहे. या लोकसंख्येत महिलांची संख्या तुलनेत जास्त असल्याचे आढळून आले आहे. भारताची लोकसंख्या १ अब्ज २१ कोटी असून त्यात पुरूषांची संख्या ९ कोटी ९ लाख ७० हजार आहे तर महिलांची संख्या ९ कोटी ९ लाख ९० हजार आहे. सार्वधिक लोकसंख्या असलेले राज्य बिहार आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षरतेत वाढ झाली आहे. ही वाढ ८ टक्के असून ६४.८ टक्क्यांवरून ७३ टक्के एवढी साक्षरतेत वाढ झाली आहे.

First Published: Wednesday, May 1, 2013, 11:48


comments powered by Disqus