देवयानी भारतात, अटकेची टांगती तलवार कायम, Indian diplomat Devyani Khobragade will get arrest?

देवयानी भारतात, अटकेची टांगती तलवार कायम

देवयानी भारतात, अटकेची टांगती तलवार कायम
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन

भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे नवी दिल्लीमध्ये परतल्यानंतरही अमेरिकेनं देवयानीला कोणतीही सूट दिली नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे, देवयानीला अजूनही अटक वॉरंट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

परदेश विभागाचे प्रवक्ते जेन प्साकी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, ‘अमेरिकेतून परतताना देवयानी आणि भारत सरकारला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की देवयानी यांना यापुढे अमेरिकेत परतण्याची अनुमती दिली जाणार नाही. केवळ कोर्टाचा आदेश याला अपवाद असेल’ असं म्हटलंय. भविष्यात तिला नियमित व्हिजा मिळणार नाही याची काळजी घेण्यासाठी तिचं नाव, व्हिजा आणि इमिग्रेशन लुकआऊट सिस्टममध्ये टाकण्यात येईल. परल्यानंतर देवयानीला अटक वॉरंट जारी केलं जाऊ शकतं, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

अमेरिकेत एका ज्यूरीच्या माध्यमातून व्हिजा छेडछाड आणि खोटी साक्ष देण्याचा आरोप असलेली वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे शुक्रवारी रात्री स्वदेशात परतलीय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 11, 2014, 13:38


comments powered by Disqus