देवयानीला पुन्हा अटक वॉरंट...

Last Updated: Saturday, March 15, 2014, 09:37

भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात अमेरिकेत अटक वॉरंट बजावण्यात आलंय. व्हिसामध्ये घोळप्रकरणी मॅनहॅटन कोर्टाने देवयानी यांना दोषी ठरवलंय.

न्यूयॉर्क कोर्टानं फेटाळले देवयानीवरचे आरोप

Last Updated: Thursday, March 13, 2014, 11:39

भारताच्या अमेरिकेतल्या माजी अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना दिलासा मिळालाय. अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टाने देवयानी यांच्यावरील आरोप फेटाळलेत.

देवयानी खोब्रागडे यांना राजनैतिक संरक्षण नाही - अमेरिका

Last Updated: Saturday, February 1, 2014, 19:07

भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकी कायद्यानुसार कुठलेही राजनैतिक संरक्षण नसून त्यांच्यावरील खटला चालूच राहणार आहे, असे मॅनहॅटनच्या सरकारी वकिलांनी शुक्रवारी न्यायालयामध्ये सांगितले. गेल्या डिसेंबरमध्ये खोब्रागडे यांना व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी अमेरिकी पोलिसांनी अटक केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.

होय, मी लोकसभा निवडणूक लढणार - खोब्रागडे

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 19:30

निवृत्त आयएएस अधिकारी आणि भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलीय.

देवयानी भारतात, अटकेची टांगती तलवार कायम

Last Updated: Saturday, January 11, 2014, 14:25

भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे नवी दिल्लीमध्ये परतल्यानंतरही अमेरिकेनं देवयानीला कोणतीही सूट दिली नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे, देवयानीला अजूनही अटक वॉरंट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

महाराष्ट्र सदनात खोब्रागडेंचा मराठीत बोलण्यास नकार

Last Updated: Saturday, January 11, 2014, 08:27

आदर्शप्रकरणावरून माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडेंचा तोल सुटलाय... महाराष्ट्र सदनात खोब्रागडे बनावट व्हिसा प्रकरणात अडकलेल्या देवयानी खोब्रागडेंसंदर्भात पत्रकार परिषद घेत होते.

देवयानी खोब्रागडे मायदेशी परतणार

Last Updated: Friday, January 10, 2014, 10:56

देवयानी खोब्रागडे यांच्यावर बनावट व्हीजा आणि चुकीची विधानं केल्याप्रकरणी खटला चालवण्यास न्यूयॉर्कच्या ग्रँड ज्युरीनं परवानगी दिलीय.. तर देवयांनी यांना राजनैतिक संरक्षण मिळाली असल्याचं अमेरिकेच्या एटॉर्नी जनरलनी म्हटलंय...

देवयानी प्रकरण : भारताने अमेरिकेवर लादले निर्बंध

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 17:35

भारतीय राजदुतातील वरिष्ठ अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याप्रकरणी माफी मागण्यास नकार दिल्याने भारताने तीव्र आक्षेप घेतला. अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारताने अमेरिकेवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेकडून देवयानीचा अपमान, मुंबईत मनसे महिला रस्त्यावर

Last Updated: Saturday, December 21, 2013, 17:14

भारतीय दुतावासातील वरिष्ठ महिला अधिकारी देवयानी खोब्रागडे यांचा अमेरिकेत झालेल्या अपमानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणा करण्यात आल्यात.

देवयानीप्रकरणी अमेरिकेच्या कंपन्या टार्गेट, मुंबईत पिझ्झा पार्लरची तोडफोड

Last Updated: Friday, December 20, 2013, 15:43

देवयानी खोब्रागडेंना वाईट वागणूक देणा-या अमेरिकन यंत्रणांवरचा राग आता अमेरिकन कंपन्यांवर निघू लागलाय. वांद्रे इथं रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी डॉमिनोजच्या पिझ्झा पार्लरमध्ये हंगामा करून तोडफोड केली. अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी डॉमिनोजमध्ये धिंगाणी घातला.

देवयानी प्रकरणः अमेरिकेचा अडेलतट्टूपणा कायम

Last Updated: Friday, December 20, 2013, 11:13

न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तणुकीसंदर्भात अमेरिकेने माफी मागावी, तसेच त्यांच्यावर आरोप मागे घ्यावे या भारताच्या मागण्या फेटाळून लावल्या आहे. देवयानी यांना गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली होती.

देवयानीप्रकरणी अमेरिकेची दिलगिरी, भारत अधिक आक्रमक

Last Updated: Thursday, December 19, 2013, 18:35

अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत दिलेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुलीला न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. तर भारताने अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी माफी मागा, असे म्हटले आहे.

देवयानी प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला खेद

Last Updated: Thursday, December 19, 2013, 09:19

न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना करण्यात आलेली अटक आणि देण्यात आलेली अपमानास्पद वागणुकीबाबत अमेरिकेनं अखेर माफी मागितलीय.

अमेरिकेचा उर्मटपणा कायम, देवायनींचा मेल

Last Updated: Thursday, December 19, 2013, 07:36

अमेरिकेतील भारतीय दुतावास कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल भारतामध्ये संतापाची लाट उसळलीय. परंतु तरीही अमेरिकेचा उर्मटपणा अद्याप कमी झालेला नाही. झाल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याऐवजी अमेरिकेने चक्क या कृत्याचं समर्थन केलंय.

देवयानी खोब्रागडे यांची युएनमध्ये कायमस्वरूपी बदली

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 18:08

अमेरिकेत अपमानित झालेल्या देवयानी खोब्रागडेंची युएनमध्ये कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे त्यांना संपूर्ण राजनैतिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेच्या समलैंगिक अधिकाऱ्यांना भारतात अटक होणार?

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 11:47

भारताच्या दूतावास अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत मिळालेल्या अत्यंत अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ भारतानंही कधी नव्हे ते अमेरिकेला शिंगावर घेतलंय... खोब्रागडे प्रकरणामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध ताणले गेलेत.

अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना ओळखपत्र परत करण्याचे आदेश

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 14:31

अमेरिकेच्या भारतीय राजनैतिक महिला अधिकाऱ्याला दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर भारतानं अमेरिकेला भारतात तैनात केलेल्या आपल्या सगळ्या राजनैतिक अधिकाऱ्यांची ओळखपत्र परत करण्याचे आदेश दिलेत.

डॉ. देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेत कपडे उतरवून चौकशी

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 13:03

भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची चक्क कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. शिवाय अट्टल गुन्हेगार असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत भारताने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या शिष्टमंडळास भेट देण्याचे भारताने टाळले आहे.

आदर्श सोसायटी सदस्य देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक

Last Updated: Saturday, December 14, 2013, 07:09

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आणि वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या सदस्य असलेल्या डॉ. देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आलीय.