बोधगया बॉम्बस्फोटाचा तपास लावण्यात एनआयएला यश Indian Mujahideen`sRanchi module behind BodhGaya blast

बोधगया बॉम्बस्फोटाचा तपास लावण्यात एनआयएला यश

बोधगया बॉम्बस्फोटाचा तपास लावण्यात एनआयएला यश
www.24taas.com, वृत्तसंस्था, पाटणा

बोधगया इथं झालेल्या १० साखळी बॉम्बस्फोटांचा तपास लावण्यात एनआयएला यश आलंय. या स्फोटांमागं इंडियन मुजाहिदीनच्या रांची मॉडेलचा हात असल्याचं एनआयएनं स्पष्ट केलंय.

बिहारमधील बोधगया इथं ७ जुलैला १० साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांच्या पाटणातील सभेआधीच २७ ऑक्टोबरला गांधी मैदानात स्फोट झाले होते. पाटणा इथं झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचं सांगण्यात येतंय.

या स्फोटांच्या तपासादरम्यन एनआयएनं रांचीतून काही जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी बोधगया बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली असल्याचं सांगण्यात येतंय.

तसंच गेल्या सोमवारी रांचीतून आणखी १० जिवंत बॉम्ब आणि काही स्फोटकं एनआयएनं जप्त केली होती. एका विद्यार्थ्यांच्या लॉजमधील एका खोलीत हे बॉम्ब सापडले होते. ज्या विद्यार्थ्याच्या खोलीत बॉम्ब सापडले तो फरार आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 6, 2013, 10:47


comments powered by Disqus