Last Updated: Friday, June 20, 2014, 13:06
मुंबईसह राज्यातील काही महत्वाच्या शहरांची रेकी दहशतवाद्यांनी केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखल्याची माहिती एनआयए या संस्थेने दिलेय. तसा इशाराही देण्यात आल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Last Updated: Wednesday, March 12, 2014, 16:59
छत्तीसगढच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यांत सीआरपीएफच्या ११ जवानांसह ४ पोलीस शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या शहिदांना आज श्रद्धांजली वाहिली.
Last Updated: Wednesday, November 6, 2013, 10:47
बोधगया इथं झालेल्या १० साखळी बॉम्बस्फोटांचा तपास लावण्यात एनआयएला यश आलंय. या स्फोटांमागं इंडियन मुजाहिदीनच्या रांची मॉडेलचा हात असल्याचं एनआयएनं स्पष्ट केलंय.
Last Updated: Thursday, September 19, 2013, 08:46
नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश आलंय. एक महिना होत आला तरी आरोप मोकाट आहेत. त्यामुळं एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेकडे याप्रकरणाचा तपास द्यावा, अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात दाखल केलीये. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Last Updated: Friday, August 30, 2013, 18:14
दहशतवादी यासिन भटकळ याला नेपाळहून अटक केल्यानंतर आज दिल्लीत आणण्यात आलंय. बिहार पोलिसांनी अटक केल्यानंतर एनआयएची टीम भटकळला दिल्लीत घेऊन आली.
Last Updated: Thursday, August 29, 2013, 12:16
दहशतवादी यासिन भटकळ, ज्याला नेपाळ पोलीस, एनआयए आणि कर्नाटक स्पेशल टास्क फोर्सनं संयुक्तरित्या पकडलं. तो यासिन भटकळ ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.
Last Updated: Thursday, March 14, 2013, 12:10
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोट प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय. बिहारमधील मुंगेरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
Last Updated: Friday, February 10, 2012, 14:44
देशातल्या विविध बॉम्बस्फोटांमधले फरार आरोपींना पकडण्यात एनआयएला अपय़श आल्याचं समोर आलं आहे. या आरोपींना पकडण्यासाठी चक्क वृत्तपत्रात जाहिरात देण्याची नामुष्की एनआयएवर ओढवली आहे.
Last Updated: Wednesday, December 21, 2011, 15:39
सरकारने पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली, लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिझ सईद, दोन आयएसआयचे अधिकारी यांच्यासह नऊ जणांवर २६/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्याची अनुमती दिली आहे.
आणखी >>