Last Updated: Monday, October 15, 2012, 13:41
www.24taas.com, पणजीभारतीय नौदलातील चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. त्यात तिघांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. त्यात दोन वैमानिकांचा समावेश आहे.
गोव्याच्या दाबोलिम विमानतळावर हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर उतरतांना हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टरचे रोटर तुटले आणि त्यानंतर आग लागली. हेलिकॉप्टर मुंबईहून आले होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
धावपट्टीवरच हा अपघात झाल्यामुळे नागरी विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही विमानांचे उड्डाण लांबल्याची माहिती देण्यात आली.
First Published: Monday, October 15, 2012, 13:35