Last Updated: Tuesday, September 24, 2013, 11:47
www.24taas.com , झी मीडिया, हैदराबाददिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना अखेर जामीन मिळालाय. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी असून गेल्या १६ महिन्यांपासून ते आंध्र प्रदेशातल्या चंचलगुडा तुरूंगात होते.
सीबीआयच्या विशेष न्यायालयानं जामीन दिला असून त्यांची आज तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. जगनमोहन यांनी या काळात हैदराबाद सोडून जाऊ नये आणि खटल्याशी संबंधित व्यक्तींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करु नये या अटीवर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केलाय.
आंध्र प्रदेशाच्या विभाजनाच्या मुद्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच जगनमोहन यांच्या सुटकेला राजकीय महत्व आहे. जगनमोहन यांच्या वाय.एस.आर. काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या विभाजनला कायमच विरोध केलाय. रायलसीमा आणि सीमांध्रामध्ये या पक्षाचा चांगला प्रभाव असून सुटकेनंतर जगनमोहन आंध्रच्या विभाजनावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 24, 2013, 11:47