कोळसा घोटाळ्यातील ‘जयस्वाल’ संबंध उघड, jaiswal relation in coal block scam

कोळसा घोटाळ्यातील ‘जयस्वाल’ संबंध उघड

कोळसा घोटाळ्यातील ‘जयस्वाल’ संबंध उघड
www.24taas.com, नवी दिल्ली
कोळसा खाण घोटाळाप्रकरणी आता आणखी एक खुलासा झालाय. केंद्रीय कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल आणि नागपुरातला उद्योगपती मनोज जयस्वालचे संबंध असल्याचं आता उघड झालंय.

खुद्द श्रीप्रकाश जयस्वाल यांनी मनोज जयस्वाल याला चार वर्षांपूर्वी भेटल्याची कबूली दिलीय. शिवाय कंपनीच्या करारनाम्यात उल्लेख असलेले कानपूरचे श्रीप्रकाश जयस्वाल हे स्वतःच असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. ‘झी न्यूज’चे संपादक सुधीर चौधरी यांच्याशी केलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये श्रीप्रकाश जयस्वाल यांनी ही कबूली दिलीय. तसंच मनोज जयस्वालशी संबंधित कोणत्याही कंपनीचा वाद मिटवला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

या सगळ्या प्रकरणामुळं काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी नाराज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, कोळसा खाण घोटाळाप्रकरणी सीबीआयचा फास आणखी सहा कंपन्याभोवती आवळण्याची शक्यता आहे. याआधी पाच कंपन्यांवर सीबीआयनं खटला दाखल केलाय. या पाच कंपन्यांपैकी तीन कंपन्या मनोज जयस्वालच्या असल्याचं आता समोर आलंय. जयस्वालला १० कोल ब्लॉकचं वितरण झालंय.

First Published: Friday, September 14, 2012, 10:33


comments powered by Disqus