मराठी माणूसही महाराष्ट्राचा भूमिपुत्र नाही- काटजू Katju on Maharashtrians

मराठी माणूसही महाराष्ट्राचा भूमिपुत्र नाही- काटजू

मराठी माणूसही महाराष्ट्राचा भूमिपुत्र नाही- काटजू
www.24taas.com, मुंबई

मराठीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मराठी जनताही मूळची महाराष्ट्रातली नसल्याचं वादग्रस्त विधान प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केलंय.

भूमीपूत्र ही संकल्पना राष्ट्रविरोधी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात मराठी माणसंही परप्रांतीयच आहेत. तेथील भिल्ल तेवढे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे हाकलायची वेळ आल्यास मराठी माणसांनाही महाराष्ट्रातून हाकलून द्यावं लागेल, असं काटजूंचं म्हणणं आहे. त्यामुळे भूमिपुत्र ही संकल्पना राष्ट्रद्रोही असून या मुद्यांचं राजकारण करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी, असं काटजूंनी म्हटलं आहे.


यापूर्वीही काटजूंनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांना देशद्रोही संबोधत अशा गद्दार लोकांना जेलमध्ये टाका असं भाषणात म्हटलं होतंय. तर काटजू यांनी नसत्या भानगडीत पडू नये असा इशारा शिवसेनेनं दिला.

First Published: Monday, April 1, 2013, 17:43


comments powered by Disqus