Last Updated: Tuesday, February 19, 2013, 16:51
सामान्य आणि सरळसोट विधानांपेक्षा सनसनाटी आणि प्रक्षोभक वक्त्यव्यांना बातमीमूल्य जास्त असते. यावर माध्यमात काम करणा-या सर्वांचेच एकमत असेल. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे या देशातील माध्यमांना नियंत्रित करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष असलेले माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्यासारख्या कायदेपंडिताला तर ही बाब अगदी चटकन लक्षात येणे स्वाभाविक आहे.