लवकरच पुन्हा एकत्र येऊ- केजरीवाल Kejariwal`s optmism

लवकरच पुन्हा एकत्र येऊ- केजरीवाल

लवकरच पुन्हा एकत्र येऊ- केजरीवाल
www.24taas.com, नवी दिल्ली

अण्णांपासून दूरावलेल्या अरविंद केजरीवाल यांनी अण्णा आणि आपण लवकरच पुन्हा एकत्र येऊ, असा आशावाद व्यक्त केलाय. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांना अण्णांनी त्यांचा फोटो किंवा नाव वापरण्याला बंदी घातली आहे. दोघांमधले संबंध टोकाचे दुरावलेत. मात्र, तरीही अण्णा आणि आपण येत्या तीन-चार महिन्यांत पुन्हा एकत्र येऊ, असा आशावाद केजरीवाल यांना वाटतोय. अण्णांना आमच्यापासून कोणीही दूर करू शकत नाही, असं केजरीवाल म्हणालेत.

दुसरीकडे आपण राजकारणात पूर्णपणे उतरणार असल्याची झलकही त्यांनी दाखवली. दिल्लीत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरोधात वाढत्या वीजदरवाढीचा मुद्दा हाती घेत केजरीवाल समर्थकांनी जमके निदर्शनं केली. तर 10 जनपथवरही सोनिया गांधींच्या निवासस्थानासमोर निदर्शनं केली. जनतेने वीजबिलं भरूच नयेत. असं आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केलं.

भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि टीम अण्णाचे सूत्रधार असणाऱ्या अण्णांनी बुधवारी मीडियासमोर केजरीवाल यांच्या राजकीय पक्षाचा आणि आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं होतं. ‘टीम अण्णा आता वेगळी झालीय, ही खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे. मी कोणत्याही पार्टी किंवा समूहामध्ये सहभागी होणार नाही किंवा त्यांच्या प्रचारकार्यातही माझा सहभाग नसेल. तसंच मी त्यांना माझा फोटो आणि नाव वापरण्यासही बंदी केलीय. तुम्हाल लढायचं असेल तर स्वत:च लढा’ असं म्हणत अण्णांनी केजरीवाल यांच्यापासून स्वतःला विभकत्त केले आहेत.

First Published: Monday, September 24, 2012, 08:00


comments powered by Disqus