चेहरे नव्हे व्यवस्था बदलण्यासाठी राजकारणात - केजरीवाल, kejriwal announcement of political party

चेहरे नव्हे व्यवस्था बदलण्यासाठी राजकारणात - केजरीवाल

चेहरे नव्हे व्यवस्था बदलण्यासाठी राजकारणात - केजरीवाल
www.24taas.com, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीमध्ये नव्या राजकीय पक्षाची घोषणा केलीय. `हा केजरीवाल`चा पक्ष नाही... हा पक्ष आहे भ्रष्टाचाराला उबलेल्या तमाम जनतेचा…’ असं म्हणत केजरीवाल आता राजकीय आखाड्यात उतरण्यास सज्ज झालेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंशी फारकत घेतल्यानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी आज नव्या राजकीय पक्षाची घोषणा केलीय. ‘मैं हूँ आम आदमी, मुझे चाहिए जनलोकपाल’असं लिहिलेली टोपी यावेळ अरविंद केजरीवाल यांनी डोक्यावर चढवली होती.

‘लोक या राजकीय पक्षाला निधी मिळवून देतील, तेच प्रचार करतील आणि तेच निवडणुकाही लढतील. चेहरे नव्हे व्यवस्था बदलण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश करतोय. देशात विरोधी पक्षच नाही... सत्ताधारी आणि विरोधकांचं साटंलोटं पदोपदी दिसून येतं. लोकपालसंदर्भात आम्हाला सर्वच पक्षांनी धोका दिलाय. पण, आता भ्रष्टाचाऱ्यांचे दिवस भरलेत. हा केजरीवाल`चा पक्ष नाही... हा पक्ष आहे भ्रष्टाचाराला उबलेल्या तमाम जनतेचा’ असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी तमाम जनतेला साद घातलीय.

First Published: Tuesday, October 2, 2012, 15:41


comments powered by Disqus