Last Updated: Wednesday, December 25, 2013, 16:55
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली आम आदमी पार्टी (आप) चे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून २८ डिसेंबरला शपथ घेतील. शनिवारी दुपारी १२ वाजता केजरीवाल हे रामलीला मैदानात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर सर्व कॅबिनेट मंत्री पदाचा शपथविधी कार्यक्रम होईल. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात आप नेता मनीष सिसोदिया यांच्यासह ६ आमदार सहभागी होतील. दरम्यान, 'आप' सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी संपर्क साधून त्यांना निमंत्रण दिले जाईल, असेही केजरीवाल यांनी सांगितले.
याआधी अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी सरकारचा शपथविधी कार्यक्रम होणार नाही, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, मंत्री मंडळात कोणाला स्थान द्यावे याबाबत पक्षात मतभेद नसल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले काँग्रेसबरोबर कोणताही समझोता केलेला नाही. काँग्रेसने स्वत:च पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा १८ मुद्द्यांवरही लागू आहे. मात्र, काँग्रेसमधून आपला पाठिंबा देण्याबाबत तीव्र नाराजी आहे.
आप कोणत्याही पक्षाबरोबर युती किंवा आघाडी नाही. केवळ मुद्यांवर आधारित पाठिंबा घेऊन दिल्लीमध्ये सरकार स्थापन करणार आहोत. पदभार स्वीकारल्यानंतर लोकांना दिलेल्या वचनाप्रमाणे काम केले जाईल, असे केजरीवाल म्हणालेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 25, 2013, 14:47