Last Updated: Tuesday, December 17, 2013, 17:03
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीअरविंद केजरीवाल यांच्या नावे बोगस ट्विटर अकाउंट उघडून त्यावरून अण्णा हजारेंवर शिव्यांची लाखोली वाहिली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, मी अण्णांना कधीही शिव्या देऊ शकत नाही. परंतु माझ्या नावाने एक बोगस ट्विटर खाते उघडण्यात आले आहे आणि त्यावरून अण्णाविरोधात अत्यंत निंदनीय शब्दांत ट्विट केले जात असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. या संदर्भात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 17, 2013, 17:03