दिल्लीच्या तख्तासाठी केजरीवाल विरुद्ध किरण बेदी?, kiran bedi to take on arvind kejriwal in del

दिल्लीच्या तख्तासाठी केजरीवाल विरुद्ध किरण बेदी?

दिल्लीच्या तख्तासाठी केजरीवाल विरुद्ध किरण बेदी?

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक ट्विट करून पक्षाला चांगलंच अडचणीत आणण्याचं काम केलंय.

`दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप तयार... मुख्यमंत्रीपदासाठी केजरीवाल यांच्याविरोधात किरण बेदी असतील भाजपच्या उमेदवार` असं ट्विट दिल्लीचे भाजपचे प्रभारी नितीन गडकरी यांनी केलंय. अगोदरच पक्षातील दुफळी मिटवता मिटवात वरिष्ठ नेत्यांच्या नाकी नऊ आलेत. त्यात गडकरी यांच्या या ट्विटनं चांगलाच भडका उडालाय.

गडकरींच्या ट्विटनंतर भाजपच्या इतर नेत्यांनी मात्र यासंबंधातून काढता पाय घेणंच योग्य समजलं. या ट्विटसंबंधी गडकरींची प्रत्यक्ष प्रतिक्रिया मात्र अद्याप समोर आलेली नाही. परंतु, पक्षाच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार गडकरींचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय. किरण बेदी यांच्याबद्दल गडकरींच्या ट्विटर अकाऊंटवरून केलेलं हे ट्विट म्हणजे कुणाची तरी खोडी असल्याचं भाजप नेते सांगतायत.

दिल्लीत अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर आंदोलनात सहभागी झालेल्या किरण बेदी या भाजपच्या अनेक नेत्यांच्या जवळच्या मानल्या जातात. त्यांनी मोदिंना आपला जाहीर पाठिंबा दिला असला तरी अजून अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही.

डिसेंबरमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून भाजपमधील अंतर्गत वादही समर आला होता. विजय गोयल यांना बाजुला सारून डॉ. हर्षवर्धन यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आलं होतं. यावेळी, जनतेनं आपली मतं `आप`च्या पारड्यात टाकली होती. त्यानंतर किरण बेदी यांच्यासोबत अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपद चालून आलं होतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 16, 2014, 14:30


comments powered by Disqus