संसदेत किश्तवाड हिंसाचार पडसाद!, Kishtwar clashes: Sajad Kitchloo resigns as J&K MoS Home

संसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!

संसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

काश्मीरमधल्या किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद संसदेत उमटलेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांना आधी बोलू देण्यावरून सरकारी बाकांवरून गोंधळ घातला गेला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.

पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर जेटली यांनी जम्मू-काश्मीर सरकारच्या कारभारावर टीका केली. किश्तवाड हिंसाचार प्रकरणी राज्यसभेत अरुण जेटली यांनी जम्मू-काश्मीर सरकारवर हल्लाबोल केला. हिंसाचार रोखण्यात ओमर अब्दुल्ला सरकार अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचंही ते म्हणाले. किश्तवाड भागाची पहाणी करण्यासाठी काश्मिरात आलेल्या जेटली यांना रोखण्यात आलं होतं.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांप्रदायिक हिंसेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलंय. हायकोर्टाचे एक सेवानिवृत्त न्यायाधीश या घटनेची चौकशी करतील. तसंच हा अहवाल सार्वजनिक करण्यात येईल, असंही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय.

दरम्यान, किश्तवाड हिंसाचारप्रकरणी जम्मू आणि काश्मीरचे गृह राज्यमंत्री सज्जाद किचलू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. या हिंसाचाराच्या वेळी किचलू हे घटनास्थळी उपस्थित असल्याच्या आरोपावरून संसदेत गदारोळ माजला होता. आपण निर्दोष असल्याचं सांगतानाच गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला होता का, असा उलटसवाल किचलूंनी केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, August 12, 2013, 14:42


comments powered by Disqus