Last Updated: Monday, October 15, 2012, 17:23
www.24taas.com, मुंबई बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह यांची चौकशी करण्यात आली.
मुंबई क्राईम ब्राँचच्या विशेष तपास पथकानं जवळपास पाच तास ही चौकशी केली. अप्पर पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील पथकानं कृपाशंकर सिंह यांच्याकडून माहिती घेतली.
कृपांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. त्यामुळं ही चौकशी होतेय. न्या. रंजना देसाई आणि न्या. आर. व्ही. मोरे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक, अंमलबजावणी
संचालनालय, आयकर आयुक्त यांना सीलबंद लिफाफ्यात २७ ऑक्टोबपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्याशी कृपाशंकर सिंह यांचे निकटचे संबंध असून त्यांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केली असल्याची जनहितार्थ याचिका सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी केली आहे. या चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्त पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात सादर करणार आहेत.
First Published: Monday, October 15, 2012, 17:23