`सीबीआय`कडून कृपाशंकर सिंह यांची चौकशी

Last Updated: Monday, October 15, 2012, 17:23

बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह यांची चौकशी करण्यात आली.

कृपांकडे बेकायदा ४०० काडतूस

Last Updated: Saturday, April 14, 2012, 16:23

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी याआधीच अडचणीत सापडलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कृपांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरक्षित भूखंडावर 'कृपां'चा साईप्रसाद इमला

Last Updated: Friday, March 30, 2012, 08:44

कृपाशंकर सिंह यांची वांद्र्यातील साईप्रसाद बिल्डिंग वादाच्या भोव-यात सापडली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली आहे. एवढच नव्हे तर इमारत बांधताना सीआरझेड नियमही धाब्यावर बसवण्यात आलेत.

'कृपां'ची चौकशी सुरूच राहणार

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 17:18

कृपाशंकर सिंहांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांची चौकशी सुरूच राहणार आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.

कृपांची संपत्ती जप्ती योग्य – सुप्रीम कोर्ट

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 18:05

बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर सिंहांना दणका दिला आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे कृपाशंकर

Last Updated: Sunday, March 11, 2012, 09:56

कुबेरालाही लाजवेल अशा कृपाशंकरांच्या बेहिशोबी संपत्तीची मोजदाद अजूनही सुरु असतानाच त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 105 एकर जमीन त्यांनी खोट्या कागदपत्राद्वारे लाटल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मयत असलेल्या जमीन मालकाला जीवंत दाखवून ही जमीन कवडीमोल भावानं लाटली.

'कृपा' माझ्या संपर्कात - मुख्यंमत्री

Last Updated: Saturday, March 3, 2012, 12:28

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गोत्यात आलेल्या कृपांचा कांगावा सुरू केला आहे. मी कुठलीही चूक केली नाही, न्यायालयीन लढाई लढणार, जप्त केलेली संपत्ती माझी नाही, असे सांगून कृपाशंकर सिंहानी हात झटकले आहेत. दरम्यान, अज्ञातवासात असलेले कृपाशंकर सिंह मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत.संपर्काबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिली आहे

कृपांबाबत काँग्रेसचे तोंडावर बोट

Last Updated: Saturday, March 3, 2012, 10:44

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल कॉंग्रेसने कायदा आपले काम करेल, एवढीच प्रतिक्रिया देऊन तोंडावर बोट ठेवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहार प्रकरणी खासदार सुरेश कलमाडी यांच्याप्रमाणेच कृपाशंकर सिंह यांच्यावरही निलंबनाची कारवाई होईल काय, या प्रश्‍नावर मात्र कॉंग्रेसने बोलणे टाळले आहे.

कृपाशंकर सिंह सर्वात मोठे दलाल- राज ठाकरे

Last Updated: Friday, March 2, 2012, 17:07

सोनिया गांधी आणि अहमद यांच्यापर्यंत अनेकांना पोहचविणारे कृपाशंकर सिंह हे मोठे दलाल असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कृपाशंकर सिंह यांचा समोर आलेला घोटाळा म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

'कृपा'छत्रावर छापे : आबांकडून पोलिसांची पाठराखण

Last Updated: Friday, March 2, 2012, 14:20

गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटलयं. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं आहे.

कृपाशंकर सिंहांच्या मुंबईतील घरांवर छापे

Last Updated: Friday, March 2, 2012, 10:36

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील दोन घरांवर आणि ऑफिसवर छापा मारला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा मारला छापा मारला आहे.

कृपाशंकर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव!

Last Updated: Thursday, March 1, 2012, 20:05

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञातवासात असलेल्य़ा कृपाशंकर सिंह यांची आता धावाधाव सुरू झाली आहे. हायकोर्टाच्या निकालानंतर त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने कृपाशंकर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे

कृपाशंकर सिंहांना केव्हाही होऊ शकते अटक

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 18:15

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या कृपाशंकर सिंह यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृपाशंकर सिंहांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 22:07

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय

कृपाशंकर यांचा राजीनामा स्वीकारला!

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 19:02

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टानं दिलेल्या झटक्यानंतर, कृपाशंकर सिंह यांच्यावर पक्षश्रेष्ठींचीही अवकृपा झालीय. मुंबई मनपा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला आहे. यामुळे कृपाशंकर सिंह यांना आज दुहेरी फटका बसलाय.

कृपाशंकर सिंहांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा!

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 16:55

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‎...तर अर्धी मुंबई बंद - कृपाशंकर सिंह

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 03:52

उत्तर भारतीय घरी बसले तर अर्धी मुंबई बंद पडते, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंह यांनी केलंय.