Last Updated: Monday, August 13, 2012, 19:06
www.24taas.com , रांची राज्यासह देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. बलात्कारास करण्यास विरोध केल्याने दोन नराधमांनी एका विवाहीत महिलेच्या चेहर्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना झारखंडमधील जामतडा जिल्ह्यातील बगदेहारी गावात घडली. पोलिस सूत्रांनूसार, २४ वर्षींय पीडित महिला तिच्या माहेरी आली होती. ती गावातील तलावात स्नान करत असताना गावातील दोन भामटे तिच्याजवळ आले. त्यांनी तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्यांना विरोध केल्याने त्यांनी तिच्या चेहर्यावर अॅसिड फेकून पसार झाले.
पीडित महिलेने दिलेल्या जबाबात खोखान आणि स्वप्न यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दोघांचा शोध घेत आहे. पीडित महिलेच्या विवाहाच्या आधी देखील आरोपी खोखान आणि स्वप्न यांनी तिच्यावर वाईट नजर होती.
First Published: Monday, August 13, 2012, 19:06