Last Updated: Sunday, November 10, 2013, 21:13
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्लीयंदाच्या पद्म पुरस्काराच्या नावांच्या शिफारशींची यादी फुटली असून काही नेते आणि मान्यवरांनी स्वतःचे मित्र तसंच नातेवाईकांची नावं या पुरस्कारांसाठी सुचवल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय.
गृहमंत्रालयानं आरटीआय कायद्याखाली एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरात १३०० जणांची शिफारस पद्म पुरस्कारासाठी आल्याचं स्पष्ट झालंय. यात भारतरत्न लता मंगेशकर, उस्ताद अमजद अली खान, अमर सिंग, राजीव शुक्ला मोतिलाल व्होरा, सुशिलकुमार शिंदे, सलमान खुर्शीद यांनी आपापल्या नातेवाईक आणि मित्रांची नावांची शिफारस केल्याचं उघड झालंय.
पद्म पुरस्कारांमधून आर्थिक लाभ होत असल्यानं मेडिसिन आणि व्यापार आणि उद्योग क्षेत्रांतूनही लॉबिंग होत असल्याचं आरटीआय कार्यकर्ते सुभाष अगरवाल यांचं म्हणणं आहे.
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्येही वशिलेबाजी केली जाते हे आता पुढं आलंय. काही मान्यवरांनी आपल्या नातेवाईकांचीच पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. `भारतरत्न` गानसम्राज्ञी लता मंगशेकर यांनी आपली बहीण गायिका उषा मंगेशकर यांची तर, ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली यांनी सरोद वादक दोन्ही पुत्र अमान आणि अयान यांची शिफारस केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, November 10, 2013, 21:13