Last Updated: Tuesday, March 26, 2013, 15:24
www.24taas.com,नवी दिल्लीपश्चिम दिल्लीत बहुजन समाजवादी पक्षा एका स्थानिक नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. तर मेट्रो स्टेशनवर एका महिलेची गोळाबार करून हत्या करण्यात आल्याने दिल्ली हादरलीय आहे.
२००९ मध्ये निवडणूक लढवलेल्या दीपक भारद्वाज यांचा अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. भारद्वाज यांच्यावर गोळीबार झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर त्यांचा मृत्यू झाला, असे वृत्तात म्हटले आहे.
दीपक भारद्वाज यांचे स्वत:च्या मालकीचे फार्म हाऊस असून गेल्या निवडणुकीच्यावेळी त्यांनी आपल्याजवळ ६०० कोटी रुपयाची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते. दक्षिण दिल्लीतील राजकोरी आज सकाळच्या सुमारास झालेल्या हल्ल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
भारद्वाज दिल्लीत मोठे बांधकाम व्यावसायिक होते. तसेच त्यांच्या मालकीचे हॉटेल, शाळाही दिल्लीत सुरू आहेत. द्वारका येथे शिक्षा भारती पब्लिक स्कूल त्यांच्या मालकीची शाळा असल्याचे सांगण्यात येते.
First Published: Tuesday, March 26, 2013, 15:24