दिल्ली मेट्रो स्टेशनवर महिलेची गोळी घालून हत्या, Woman killed in Delhi Metro station shootout

दिल्ली मेट्रो स्टेशनवर महिलेची गोळी घालून हत्या

दिल्ली मेट्रो स्टेशनवर महिलेची गोळी घालून हत्या
www.24taas.com,नवी दिल्ली

पूर्व दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीने गोळीबार केला. पतीने केलेल्या गोळीबारात पत्नी जागीच ठार झाली तर तिचे वडील जखमी झालेत.

पतीने केलेल्या गोळीबारात पत्नी जागीच ठार झाल्याची घटना पूर्व दिल्लीतील कड़कड़डूमा मेट्रो स्टेशनवर दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास घडली. एस्केलेटरवरून ही महिला आपल्या वडिलांसोबत मेट्रो स्टेशनमध्ये येत होती. याचवेळी तिच्या पतीने तिच्यावर गोळीबार केला. यात ती ठार झाली.


ठार झालेल्या महिलेचे नाव दीप्ती सांगण्यात येत आहे. तर आरोपी तिचा पती पवन हा गोळी झाडून १२ बोरची डबल्ल बॅरल गन सोडून पळून गेला. घटनास्थळाजवळ पाच काडतूसचे खोके जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिल्लीतील ही दुसरी घटना आहे. दक्षिण दिल्लीत वसंत कुंज परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी एका स्थानिक बसपा नेत्याची गोळी मारून हत्या केली.

First Published: Tuesday, March 26, 2013, 15:08


comments powered by Disqus